Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक…नेमकं काय घडलं?

Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक…नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 13, 2026 | 1:12 PM

मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या एसी लोकलमध्ये वातानुकूलन (एसी) यंत्रणा सुमारे 15 मिनिटे बंद असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. यामुळे डब्यात मोठ्या प्रमाणावर उकाडा निर्माण झाला असून अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

प्रवाशांच्या माहितीनुसार, एसी बंद झाल्यानंतर डब्यातील वातावरण अत्यंत उष्ण आणि गुदमरवणारे झाले. त्यामुळे अनेक प्रवाशांची प्रकृती बिघडली, तर काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी इतर प्रवाशांनी तत्काळ मदत करत महिलांना सावरले.

घटनेदरम्यान अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच डब्याचे दरवाजे उघडण्यात आले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

Published on: Jul 13, 2026 1:12 PM
Follow Us