भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

| Updated on: Jan 18, 2022 | 10:30 AM

सोमय्यांच्या या आरोपाविरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुंबई उच्च न्यायालयालयाच्या नागपूर खंडपीठात मानहानीचा दावा दाखल केला होता.  नागपूर खंडपीठानं तो दावा फेटाळून लावला आहे.

Follow us on

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेस टक्केवारी घेत असल्याचा आरोप केला होता. सोमय्यांच्या या आरोपाविरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुंबई उच्च न्यायालयालयाच्या नागपूर खंडपीठात मानहानीचा दावा दाखल केला होता.  नागपूर खंडपीठानं तो दावा फेटाळून लावला आहे. यामुळं किरीट सोमय्यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयानं दावा फेटाळल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट द्वारे दिली आहे.