Local Viral Video : भावानं धरलं अन् हाणलं… लोकल ट्रेनमधील हाणामारीचा बघा व्हिडीओ, नेमका कुठला प्रकार?

Local Viral Video : भावानं धरलं अन् हाणलं… लोकल ट्रेनमधील हाणामारीचा बघा व्हिडीओ, नेमका कुठला प्रकार?

| Updated on: Sep 10, 2025 | 12:39 PM

ठाणे-वाशी लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दोन प्रवाशांमध्ये झालेल्या या हाणामारीत सहप्रवाशांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. तरीसुद्धा या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होऊन चर्चेचा विषय बनला आहे.

सध्या मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळे सध्या कोणत्याही वेळात तुम्ही ट्रेनने प्रवास केला तरी ट्रेनमध्ये गर्दी दिसते. ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना वाद होणं, सीटवर बसण्यावरून वाद होणं, धक्काबुक्कीवरून सुरू झालेला वाद टोकाला पोहचणं हे प्रकार देखील रोज घडताय. अशातच ठाणे-वाशी लोकलमधील एका हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन प्रवाशांमध्ये सीटवर बसण्याबाबत वाद झाल्याचे दिसून येते. हा वाद एवढा वाढला की तो हाणामारीत बदलला. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या फ्री स्टाईल हाणामारीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र, नंतर सहप्रवाशांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. या घटनेमुळे लोकल प्रवाशांमधील वादविवाद आणि सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Published on: Sep 10, 2025 12:35 PM