Congress News | मविआत तणाव शिगेला! ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला, बिनविरोधचा फॉर्म्युला निघणार?

Congress News | मविआत तणाव शिगेला! ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला, बिनविरोधचा फॉर्म्युला निघणार?

| Updated on: Apr 30, 2026 | 1:41 PM

महत्वाची घडामोड म्हणजे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे शिष्ट मंडळ काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. अनिल देसाई, अनिल परब, अंबादास दानवे, हे सपकाळ यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. ठाकरेंचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे. काँग्रेसची सकाळची प्रतिक्रिया आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस, अशातच ठाकरेंचे शिष्टमंडळ जे आहे ते सपकाळांच्या भेट घेतली आहे.

महत्वाची घडामोड म्हणजे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे शिष्ट मंडळ काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. अनिल देसाई, अनिल परब, अंबादास दानवे, हे सपकाळ यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. ठाकरेंचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे. काँग्रेसची सकाळची प्रतिक्रिया आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस, अशातच ठाकरेंचे शिष्टमंडळ जे आहे ते सपकाळांच्या भेट घेतली आहे. तर या बैठकीला यश येणार का? काँग्रेसची समजूत काढून ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश येणार का? आज विधानपरिषदेची अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि माविआकडे अवघी एक जागा विधानपरिषदेसाठी आहे परंतु काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं वारंवार कि जर उद्धव ठाकरे जर माविआकडून विधानपरिषदेसाठी चेहरा असतील तर काँग्रेसचा त्याला पाठिंबा आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक न लढवता विधानपरिषदेची त्यांनी ही संधी जी आहे ती अंबादास दानवे जे माजी विरोधी पक्ष नेते राहिले आहेत विधानपरिषदेचे त्यांना ही संधी दिली होती या सगळ्या संदर्भात आता काँग्रेसने नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आणि काँग्रेसने देखील आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. ह्या बैठकीनंतर काही तोडगा निघणार आहे का? उमेदवार जो देणार आहे तो ह्या चर्चेनंतर देणार नाही का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु माविआमध्ये आता ठिणगी पडली आहे. काय नेमकं घडतंय ते पाहणं महत्वाचं आहे.

 

Published on: Apr 30, 2026 01:41 PM
Follow Us