आष्टीकर, तुम्ही पुन्हा… ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या पक्षप्रवेशामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश होता. मात्र, या निर्णयानंतर ठाकरे गटातील अनेक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, आता एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये एक शिवसैनिक नागेश पाटील आष्टीकर यांना पक्ष सोडण्याबाबत जाब विचारत असल्याचे ऐकू येत आहे. तसेच त्यांनी पक्ष का सोडला, असा सवालही वारंवार केला जात असल्याचे समोर आले आहे.
या ऑडिओमध्ये संबंधित शिवसैनिकाने, “तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही, याची 100 टक्के खात्रीने सांगतो,” असे वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. या शिवसैनिकाचे नाव नंदकिशोर देशमुख असल्याचे सांगितले जात आहे.
(टीव्ही9 मराठी सदर ऑडियो क्लिपची पुष्टी करत नाही)