Marathi News Videos Nashik news Severe water shortage in Yeola in Nashik district Even after digging a well 65 feet deep, the well is not getting water

तब्बल 65 फूट खोल विहीर खोदूनही विहिरीला पाणी नाही, शेतकरी हतबल अन् …
VIDEO | दुष्काळग्रस्त नाशिकच्या येवल्यात पाणीटंचाईची झळ, शेतकरी विहीर खोदूनही हतबल अन् पाण्यासाठी वणवण
नाशिक : दुष्काळग्रस्त येवला तालुक्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथे शासनाच्या वतीने एकीकडे वीस टँकरद्वारे 43 गावांमध्ये पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात आहे तर दुसरीकडे शेतकरी आपल्या शेतामध्ये नव्याने विहीर खोदून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लगबग सुरु आहे. अंदरसूल गावातील शेतकरी अविनाश गोरख खैरनार यांनी साडेचार लाख रुपये कर्ज काढून नव्याने नऊ परस म्हणजे 65 फूट खोल विहीर केली. इतक्या खोल विहिरीत मजुरांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले पण या विहिरीला पाणी न लागल्यामुळे शेतकऱ्याचा संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी नाराज झाला आणि हतबल झाला आहे. पाणी नसल्याने शेती करावी कशी, नवीन पिक घ्यावे कसे, घेतलेले कर्ज फेडावे कसे असा मोठा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.
Published on: May 30, 2023 3:14 PM
Related Video
10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच
पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, 'या' ठिकाणांना द्या भेट
सियाच्या भावाला सर्वकाही माहिती होतं? तर तो शांत का राहिला ?
टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली?
रंगभूमी पोरकी झाली, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले