Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात…

Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात…

| Updated on: Jun 29, 2026 | 11:41 AM

नसरापूर येथील गाजलेल्या अत्याचार प्रकरणातील दोषी भीमराव कांबळी याच्या शिक्षेबाबत आज न्यायालय महत्त्वपूर्ण निर्णय देणार आहे. चार दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने भीमराव कांबळी याला दोषी ठरवले असून, आता त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात झाली असून, अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत न्यायालयाने निकालाच्या टप्प्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण केली आहे. आज शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय जाहीर होणार आहे.

संवेदनशील प्रकरण लक्षात घेता न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असून न्यायालय परिसरावर सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे.

दरम्यान, पीडित कुटुंबासह राज्यभरातील नागरिकांचे लक्ष आजच्या निकालाकडे लागले असून, दोषीला कठोर शिक्षा होण्याची मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. आज न्यायालयाकडून होणारा निर्णय या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Published on: Jun 29, 2026 11:41 AM
Follow Us