मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध…
नताशा आव्हाड यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, हे विधेयक लोकशाही आणि संविधानासाठी धोकादायक आहे, कारण ते विरोधी पक्षांना मिळणाऱ्या जागा मर्यादित करून भाजपला अवाजवी फायदा देण्याचा प्रयत्न आहे. आपला पक्ष याला पाठिंबा देणार असेल, तर तो निर्णय चुकीचा ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर आपली तीव्र भूमिका स्पष्ट केली आहे. जर आपला पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल, तर त्या निर्णयाला माझा विरोध असेल, असे नताशा आव्हाड यांनी म्हटले आहे. लोकशाही टिकवण्यासाठी या विधेयकाला विरोध करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ट्वीट करत नमूद केले. नताशा आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, वाढत्या मतदार संख्येच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक असली तरी, प्रस्तावित विधेयक हे विरोधी पक्षांना मिळणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा प्रयत्न आहे.
यातून भाजपला अवाजवी फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपची लोकप्रियता कमी होत असल्याने, हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न असल्याचेही नताशा आव्हाड म्हणाल्या. ज्यांना या राष्ट्राची लोकशाही व्यवस्था टिकवायची आहे, त्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले. या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे राष्ट्र आणि संविधानाची मोठी हानी करण्यासारखे होईल, असे त्यांचे मत आहे. आपल्या पक्षाने या भूमिकेचा पुनर्विचार करावा, अशी आशाही नताशा आव्हाड यांनी व्यक्त केली.
