Ajit Pawar NCP Roadshow : पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो, रॅलीला तुफान प्रतिसाद
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार गुलाबी रंगाच्या वाहनातून शहरात रोड शो करत आहेत. शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वती या भागातून हा पाच तासांचा रोड शो सुरू आहे. कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसत असून, महिलांकडून औक्षण केले जात आहे. दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन ते पुणे महापालिकेसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शहरात भव्य रोड शो केला. गुलाबी रंगाच्या खास वाहनातून त्यांनी शिवाजीनगर, कसबा, कोथरूड आणि पर्वती या प्रमुख विधानसभा मतदारसंघांना भेट दिली. सुमारे पाच तास चाललेल्या या रोड शोमध्ये स्थानिक नेते आणि प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार त्यांच्यासोबत होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली असून, रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या नागरिकांनी अजित पवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि महिलांकडून औक्षण करण्यात आले. अजित पवार स्वतः गाडीत उभे राहून नागरिकांना अभिवादन करत होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मागील निवडणुकीत भाजपने येथे सत्ता मिळवली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. दुपारी ४ वाजता अजित पवार पत्रकार परिषद घेऊन पुणे महापालिकेसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
फोन करून पदाधिकारी रडतात, माझ्यासोबत... अभिजीत अडसूळांचा भाजपवर आरोप

