Mahayuti Election Campaign : महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे अन् दादा कुठं दौऱ्यावर?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्यभर सभा आणि रोड शो घेत आहेत. फडणवीस लातूर, कल्याण-डोंबिवली, ठाण्यात प्रचार करत आहेत, तर शिंदे अमरावती, अकोल्यामध्ये. अजित पवार पुण्यात भव्य रोड शो करत स्थानिक उमेदवारांसाठी मते मागत आहेत.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून राज्यभरात प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार विविध शहरांमध्ये सभा व रोड शो घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर, कल्याण-डोंबिवली येथे सभा पार पडणार आहेत. ठाण्यात त्यांची जाहीर मुलाखतही होणार आहे, तसेच तिथे त्यांची प्रचारसभादेखील आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अमरावती आणि अकोल्यामध्ये प्रचारसभा घेणार आहेत. अमरावतीमध्ये फडणवीसांच्या नंतर आता शिंदे प्रचारासाठी पोहोचले आहेत.
दुसरीकडे, अजित पवारांचा पुण्यात आज पाच तासांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातल्या तीन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमधून हा रोड शो जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार सभा आणि पाठोपाठ रोड शो करत आहेत. सध्या महायुतीचे हे तीन महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या प्रचारात पूर्णपणे उतरले असून, संपूर्ण राज्यात त्यांच्या जोरदार प्रचारसभा आणि दौरे सुरू आहेत.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
फोन करून पदाधिकारी रडतात, माझ्यासोबत... अभिजीत अडसूळांचा भाजपवर आरोप

