Ajit Pawar : मोठी बातमी, सूरज चव्हाण राजीमाना देणार? अजित पवार यांचा आदेश काय? प्रकरण नेमकं काय?
लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीमुळे, सुनील तटकरेंनी आपले पुढील दौरे रद्द केले आहेत. घाडगे यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. छावा संघटनेने लातूर बंदचे आवाहन केले आहे. अशातच मोठी बातमी समोर आलीये.
राज्याच्या राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचा कार्यकर्ता विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर राज्यभरात एकच संताप व्यक्त करत राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसताय. अशातच सूरज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा असे आदेशच अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर सूरज चव्हाण यांनी विजयकुमार घाडगेंना केलेली बेदम मारहाण चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळतंय.
लातूरमध्ये विजयकुमार घाडगेंना सूरज चव्हाण यांच्याकडून मारहाण करण्यात आली होती यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या लातूरमध्येच उपचार सुरू आहे. पोटात त्रास होतोय, बोलायलाही त्रास होतोय अशी प्रतिक्रिया सध्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना घाडगे यांनी दिली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

