Ajit Pawar : मला जे वाटतं तेच मी करेन, दमानियांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर दादा स्पष्टच म्हणाले…
अंजली दमानिया यांनी केलेल्या राजीनामा मागणीवर अजित पवारांनी मला जे योग्य वाटेल तेच मी करेन असे ठाम वक्तव्य केले. निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी दमानियांची मागणी होती. यावर अजित पवार म्हणाले की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मी योग्य तो निर्णय घेईन.
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून, बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. त्यानंतर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा घेणार आहेत. तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी केलेल्या राजीनामा मागणीवर अजित पवारांनी मला जे योग्य आणि सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मी योग्य तो निर्णय घेईन, असे वक्तव्य केले आहे. दमानिया यांनी पदावर असताना निष्पक्ष चौकशी होणार नसल्याचे सांगत राजीनाम्याची मागणी केली होती.
दरम्यान, पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलेल्या ४२ कोटींच्या नोटीसबाबतही अजित पवारांनी भाष्य केले. व्यवहार रद्द करत असताना ४२ कोटी रुपये कशासाठी आकारले जात आहेत, याची चौकशी करावी लागेल असे त्यांनी नमूद केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

