Ladki Bhain Yojana Video : अपात्र महिलांचे पैसे परत घेणार? अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, ‘मागे वेळ कमी…’

Ladki Bhain Yojana Video : अपात्र महिलांचे पैसे परत घेणार? अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, ‘मागे वेळ कमी…’

Harshada Shinkar | Updated on: Jan 23, 2025 | 5:08 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मोठी कबुली दिली आहे. बघा काय म्हणाले अजित पवार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मोठी कबुली दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना आपले आधार कार्ड बँकेशी जोडणं अनिवार्य होतं. मात्र ज्या महिलांचे आधार कार्ड योजनेचे पैसे जमा होणाऱ्या अकाऊंटच्या बँकेशी लिंक नव्हते अशाही महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे १५०० रूपये जमा झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं. अशातच आधार लिंक झाल्याशिवाय लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे गेल्याचे उघड झाले आहे. मागे वेळ कमी होता त्यामुळे बहिणींचे आधार लिंक करता आले नाहीत, असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मोठी कबुली दिली. ‘मागच्या वेळेला मर्यादित वेळ होता. त्यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आधार लिंक करायचे होते. मात्र वेळ कमी असल्याने ते करता आले नाही.’, असं सांगत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना थेट कबुलीच दिल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता खरंच ज्यांना या योजनेचे पैसे मिळायला हवेत त्यांनाच ते पैसे कसे जातील याकरता आम्ही हळू हळू पाऊलं उचलत आहोत, असंही अजित पवार यांनी म्हटले. तर मध्यंतरी लाडकी बहीण योजनेचे निकष धुडकावून ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता किंवा ज्या महिला अपात्र असताना त्यांनी अर्ज केला होता. त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे दंडाच्या रक्कमेसह वसूल केले जाणार अशी चर्चा होत होती. मात्र यावर अजित पवार यांनी रिकव्हरीचा अजिबात विचार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे.

Published on: Jan 23, 2025 5:08 PM
Follow Us