राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?

राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?

| Updated on: Jul 14, 2026 | 1:45 PM

राजकीय वर्तुळातून काल एक धक्कादाय माहिती समोर येताच मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे

राजकीय वर्तुळातून काल एक धक्कादाय माहिती समोर येताच मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या चर्चांना उधाण येताच राष्ट्रवादीत आंतर्गत वाद सुरू आहे का? अशा चर्चांनाही जोर आला.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्याांची प्री-कॅबिनेट बैठक सुरू असल्याचं समोर आलं आहे. ही बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयात पार पडत आहे. मंत्री छगन भुजबळ, दत्ता भरणे, नरहरी झिरवळ या बैठकीला उस्थित असल्याची माहिती आहे.

Published on: Jul 14, 2026 1:45 PM
Follow Us