चंद्रकांत खैरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीका, पहा काय म्हणाले, घ्या अढावा महाफास्ट न्यूज 100 मधून

चंद्रकांत खैरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीका, पहा काय म्हणाले, घ्या अढावा महाफास्ट न्यूज 100 मधून

| Updated on: Oct 06, 2022 | 7:38 PM

कालच्या भाषणावरून शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका

औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. त्यांनी शिंदे यांच्यावर, आधी पक्ष फोडला आता घर फोडण्याचे निच काम करत असल्याची टीका केली. तर कालच्या भाषणावरून शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. तर पक्षासाठी एकही आंदोलन केलं नाही त्या ताई जेंव्हा गुलाबराव, दादा भूसेंना गदार म्हणतात तेंव्हा हसायला होतं, असं म्हात्रे यांनी म्हटलं आहे. तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी स्क्रिप्टचं भाषण कितीही करा काहीही फरक पडणार नाही असं म्हटलं आहे. तर शिंदेच्या भाषणावेळी लोक उठून गेले असेही त्या म्हणाल्या.

 

Published on: Oct 06, 2022 07:38 PM