गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय धरले अन्… नागपूरात मोठ्या घडामोडी
नीट पेपर लीकप्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातही आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने गडकरी यांच्या निवासस्थानासमोर जनआक्रोश घेराव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इथेनॉलच्या वापरावरून नितीन गडकरी यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोर्चाला दुपारी 1 वाजता महाल परिसरातील चिटणीस पार्क चौकातून सुरुवात झाली. त्यानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गडकरी यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना निवासस्थानापर्यंत पोहोचू दिले जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.