Kailas Bhosale | Nashik | अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही- कैलासराव भोसले

Kailas Bhosale | Nashik | अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही- कैलासराव भोसले

| Updated on: Mar 04, 2026 | 4:23 PM

नाशिकसह राज्यात सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. दरम्यान, अमेरिका–इस्रायल–इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम होणार का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या युद्धाचा महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झालेला नाही.

नाशिकसह राज्यात सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. दरम्यान, अमेरिका–इस्रायल–इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम होणार का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या युद्धाचा महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झालेला नाही. महाराष्ट्रातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात नाशिक जिल्ह्यातून केली जाते. दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत आखाती देशांकडे मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांत युरोप, यूके आणि रशिया या देशांकडे निर्यात वाढते. सध्या द्राक्ष निर्यात मुख्यतः युरोप, यूके आणि रशिया या मार्गांवर सुरू असून त्यांचा वाहतूक मार्ग वेगळा आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील युद्धपरिस्थितीचा या निर्यातीवर थेट परिणाम झालेला नाही. आखाती देशांकडे सध्या होणारी निर्यात अत्यल्प असल्याने त्याचा एकूण व्यापारावर विशेष परिणाम झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे युद्धाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त होत असली तरी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक आणि निर्यातदार यांना सध्या दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

Published on: Mar 04, 2026 4:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us