पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच भरलेलं जहाज…

पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच भरलेलं जहाज…

| Updated on: Jul 07, 2026 | 1:13 PM

मुंबईच्या मनोरी बीच परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तेलाने भरलेले एक मालवाहू जहाज अडकून पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोराई-मानोरी किनाऱ्याजवळ समुद्राच्या लाटांसोबत वाहत आलेले हे जहाज आता भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असून त्यावर सतत नजर ठेवण्यात येत आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अडकलेल्या जहाजाचे नाव “AL JAFZIA” असे आहे. मुसळधार पाऊस आणि समुद्रातील बदलत्या परिस्थितीमुळे जहाज किनाऱ्याकडे वाहत आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जहाजात तेल असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र खचाखच तेलाने भरलेल्या महाकाय जहामुळे लिकेज सुरु झालं तर स्थानिकांना त्रास होऊ शकतो. सध्यातरी यामध्ये कोणतीच गळती नाही.

भारतीय तटरक्षक दलाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून जहाज सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच या प्रकरणी येलो गेट पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जहाज किनाऱ्यावरून हटवण्यासाठी आणि पुढील तपासासाठी तटरक्षक दल व पोलीस प्रशासन समन्वयाने काम करत आहेत. सध्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Published on: Jul 07, 2026 1:13 PM
Follow Us