Indian Army : ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकिस्तानला फुटला घाम, जाणून घ्या अमरप्रीत सिंग नेमके कोण?
एअर चीफ मार्शल सिंग यांनी स्वतः या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील सर्वोत्तम वैमानिकांची निवड केली आणि ऑपरेशनची प्रत्येक रणनीती वैयक्तिकरित्या तयार केली. या मोहिमेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची अंतिम मान्यता मिळाली. या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले सर्व भारतीय वैमानिक सुरक्षित परतले हे उल्लेखनीय आहे.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसवर अचूक आणि धाडसी हल्ला करून पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. या यशस्वी ऑपरेशन ‘सिंदूर’चे नेतृत्व स्वतः एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केले होते, जे या हल्ल्याचे धोरणात्मक नायक आणि खरे नायक ठरले आहेत. पाकिस्तानातील रावळपिंडीतील हल्ल्यात अमर प्रीत सिंग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अमर प्रीत सिंग यांच्या नेतृत्त्वात नूर खान एअरबेसवर हल्ला करण्यात आला. अमर प्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख चीफ मार्शल आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांच्याकडून आयएएफच्या सर्वोत्तम वैमानिकांची निवड करण्यात आली दरम्यान, भारताकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच घाम फुटला तर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याला तीन तास बंकरमध्ये लपून बसावं लागलं होतं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

