Operation Sindoor : जिथं 26\11च्या कसाबला प्रशिक्षण, त्या ट्रेनिंग कॅम्पला भारतानं केलं उद्ध्वस्त, उरला फक्त सापळा, बघा कशी झाली अवस्था?
बुधवारी रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांनंतर लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण ठिकाण पूर्णपणे ढिगाऱ्यात रूपांतरित झाले आहे. या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ आता समोर येत आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, मुरिदकेमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर २४ क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती आहे. भारताच्या हल्ल्यानंतर मुरिदकेमधील एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यावरून भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद पाकड्यांच्या चांगलीच लक्षात आली असेल. मरकज तैयबा हे मुरीदके येथे आहे, जे लष्कर-ए-तैयबाचे सर्वात महत्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे शस्त्रास्त्र प्रशिक्षण, शारीरिक प्रशिक्षण, धार्मिक प्रचार आणि दहशतवाद्यांच्या कट्टरपंथी विचारसरणीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पाकिस्तान व्यतिरिक्त परदेशातूनही लोक प्रशिक्षणासाठी या ठिकाणी येत असल्याचे सांगितले जाते. माहितीनुसार, २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना मुरीदके सेंटरमध्ये ‘दौरा-ए-रिब्बत’ म्हणजेच गुप्तचर प्रशिक्षण देण्यात आले होते. यासोबतच, २६/११ हल्ल्यातील महत्त्वाचे कट रचणारे कोलमन हेडली आणि तहव्वुर हुसेन राणा यांनीही जकी-उर-रहमान लखवीच्या सूचनेवरून या केंद्राला भेट दिली होती. बघा त्याची काय झाली आता अवस्था…
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

