Operation Sindoor : पाक लष्कर अन् दहशतवाद्यांची मिलीभगत पुन्हा उघड, अतिरेक्याच्या दफनविधीला अधिकाऱ्यांची हजेरी
भारताकडून पाकिस्तानवर मध्यरात्री करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. तर त्यांच्यातील धडकी कायम आहे. अशातच घाबरलेल्या पाकिस्तानकडून भारतीय राजदुतांना समन्स पाठवण्यात आलं आहे.
पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अतिरेकी अब्दुल रौफच्या दफनविधीवेळी पाकिस्तान लष्कराचे अधिकारी उपस्थित दहशतवादी आणि पाक लष्कराची मिलीभगत पुन्हा एकदा उघड झाल्याचे पाहायला मिळतंय. एकीकडे पाकिस्तानकडून असा कांगावा करण्यात येत आहे की, आम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही, दहशतवाद्यांसाठी आमच्याकडे स्थान नाही. मात्र दुसरीकडे अब्दुल रैफच्या दफनविधीवेळी पाकचे लष्कर अधिकारी उपस्थित असल्याचे पाहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर अतिरेकी अब्दुल रौफच्या दफनविधीवेळेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असे दिसतेय की, अतिरेकी अब्दुल रौफच्या दफनविधीवेळी त्याचे पार्थिव नेत असताना त्यावेळी पाकच्या लष्कर अधिकाऱ्यांनीच हजेरी लावली आहे. अब्दुल रौफ हा भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मारला गेला. लष्कर ए तोयबाचा तो कमांडर असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे पाक पूर्णतः कांगावा करत असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आलंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

