Operation Sindoor : पहलगामचा बदला, पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं झालं एअर स्ट्राईक
पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना बॉर्डरवर जाण्याची सूचना करण्यात आलीये. सगळीकडे अलर्ट जाहीर करण्यात आलेला असून बॉर्डरवर आता सुरक्षा अधिकच सतर्क झालेली आहे.
पाकिस्तान आणि पीओकेमध्ये नऊ ठिकाणी भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. पाकिस्तानातील मरकज सुभान अल्लाह बहावलपूर या ठिकाणी जैश ए मोहम्मद हेडक्वार्टर होतं. मरकज तोयबा मुरीदके पाकिस्तान याठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं. सरजल कॅम्प सियालकोट पाकिस्तान याठिकाणी जैश ए मोहम्मदच केंद्र होतं. मेहमुना जोया कॅम्प सियालकोट पाकिस्तानातच हिजबुल मुजाहिद्दीनचा कॅम्प होता. सवाई नाला कॅम्प मुजफ्फराबाद पीओके याठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं. सैयद्दना बिलाल कॅम्प मुजफ्फराबाद पीओके याठिकाणी जैश ए मोहम्मदच ट्रेनिंग कॅम्प होतं. गुलपुर कॅम्प कोटली पीओके याठिकाणी लष्कर ए तोयबाच बेस कॅम्प होतं. बरनाळा कॅम्प भिंबर पीओके याठिकाणी लष्कर ए तोयबाच केंद्र होतं. अब्बास कॅम्प कोटली पीओके याठिकाणी लष्कर ए तोयबाच केंद्र होतं. हे दहशतवादाचे अड्डे भारताकडून उद्ध्वस्त कऱण्यात आलेत.
ऑपरेशन सिंदूरचे हे 3 मोठे शिकार अन् 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

