6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह…
ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या घडामोडींना "ऑपरेशन टायगर" असे नाव देण्यात आले होते. आता या मोहिमेशी संबंधित काही जुने फोटो समोर आल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या घडामोडींना “ऑपरेशन टायगर” असे नाव देण्यात आले होते. आता या मोहिमेशी संबंधित काही जुने फोटो समोर आल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
समोर आलेल्या फोटोंमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत काही फुटीर खासदार दिसत आहेत. यातील एका फोटोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित असल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटातील 5 खासदारांना ओम बिर्ला यांच्याकडे नेले होते. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनाही चर्चेसाठी आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
18 जून रोजीचा हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. हे संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गुप्तपणे पार पडल्याची चर्चा असून या घडामोडींमध्ये श्रीकांत शिंदे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
