AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Masood Azhar : जैशचा म्होरक्या मसूद अझहरला पाक सरकारकडून 14 कोटी मिळणार, पाकिस्तानात पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे तयार होणार?

Masood Azhar : जैशचा म्होरक्या मसूद अझहरला पाक सरकारकडून 14 कोटी मिळणार, पाकिस्तानात पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे तयार होणार?

| Updated on: May 14, 2025 | 7:11 PM
Share

ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचेही मोठे नुकसान झाले. भारताच्या आक्रमक वृत्तीमुळे पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केली होती.

पाकिस्तान सरकार जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला १४ कोटी रूपयांची मदत देणार असल्याची बातमी समोर येत आहे. भारताकडून कऱण्यात आलेल्या ऑपरेश सिंदूर अंतर्गत मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा करण्यात आला होता. यातील प्रत्येक व्यक्तीला पाकिस्तानी सरकार १ कोटी रूपये देणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून मसूज अजहरला ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दरम्यान जागतिक दहशतवाद्याला पाकिस्तानकडून आर्थिक मदत देत दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर भारतीय हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय पुन्हा बांधण्याचे आश्वासनही पाकिस्तान सरकारने दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा अतिरेक्यांचे अड्डे तयार होणार का? असा सवाल केला जात आहे.

 

Published on: May 14, 2025 07:11 PM