PM Modi : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करतील. भारत-पाकिस्तान युद्धबंदी करारानंतर काही दिवसांनी हे भाषण होत आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्यामध्ये १०० दहशतवादी आणि ४० पाकिस्तानी लष्करी सैनिक मारले गेले.
‘ऑपरेशन सिंदूर’ राबविल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी परस्पर युद्धबंदीचा करार केल्यानंतर दोन दिवसांनी पंतप्रधानांचे हे भाषण होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं आणि त्यानंतर दोन्ही देशात सुरू असलेल्या संघर्षानंतर युद्धबंदी करण्यात आली. यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार असल्याने नेमकं काय बोलताय? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
मोदी पुन्हा रात्री ८ वाजता संबोधित करणार
जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करतात तेव्हा देशवासीयांमध्ये एक वेगळीच भिती दिसून येते. कारण २०१६ पासून आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी जे काही मोठे निर्णय घेतले आहेत, ते सर्व निर्णय त्यांनी रात्री ८ वाजता देशवासीयांना सांगितले आहेत. नोटाबंदीची माहिती असो किंवा लॉकडाऊनची घोषणा असो, पंतप्रधान मोदींनी रात्री ८ वाजता सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे मोदी आज ८ वाजता काय बोलणार? याची उत्सुकता लागली आहे.