PM Modi यांनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला अन् ऑपरेशन सिंदूरमधील फाइटर्सची घेतली भेट
पंतप्रधानांकडून एअरबेसवर जात भारतीय सैनिकांची भेट घेतली भारत माता की जय या घोषणेने आदमपूर एअरबेस दणाणला. जमीन, पाणी आणि हवेतलं युद्ध लढून झालं. आता मोदींचा पाकिस्तानसोबत सर्वात मोठा माइंड गेम... मोदींनी आदमपूर एअरबेसच्या मुख्यालयात जात फोटो काढलाय. आदमपूर एअरबेसच्या बोर्डवरच्या मजकुरातून पाकला कडक संदेशही दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसवर आज जवानांची भेट घेतली आणि या भेटीमुळे पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटलाय. मोदींनी यावेळी पाकिस्तानला आपली धावपट्टी आणि एअर डिफेन्स सिस्टीम दाखवली. यासह एस-400 सुरक्षित आहे, मिग-29 सुरक्षित आहे, हा शत्रूला संदेश मोदींनी दिलेला आहे. पाकिस्तानकडून जे फोल दावे करण्यात आले होते त्यावर आता मोदींनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून याच एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा
आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा पाकिस्तानी केला होता. आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगवाही पाकने केला होता. त्याच धावपट्टीवर पंतप्रधान मोदींनी विमान उतरवून धावपट्टी सुरक्षित आहे हे दाखवलं. आदमपूरमधील एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा ठरवला. त्यात एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहत मोदींनी जवानांसोबत संवाद साधला. तर पाकिस्तान आदमपूर एअरवेज उद्ध्वस्त केल्याचे मॉर्फ केलेले फोटो दाखवले होते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

