‘करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: उद्धव ठाकरे, फडणवीस व शिंदे एकमेकांवर बरसले, कोण काय म्हणालं?
'आम्ही ज्या तळमळीने सांगतोय त्यावर विरोधकांचे आरोप होत आहेत. केलेली कामे कुठे आहेत? ना कधी नेते निर्माण केले ना कधी कामं निर्माण केली फक्त दुसऱ्याचं उचलायचं अशी टीका ठाकरेंनी विरोधकांवर बोलताना केली आहे. तुम्ही जन्माला कशाला आलात?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्तिथ केलाय.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सध्या सर्वत्र प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘आम्ही ज्या तळमळीने सांगतोय त्यावर विरोधकांचे आरोप होत आहेत. केलेली कामे कुठे आहेत? ना कधी नेते निर्माण केले ना कधी कामं निर्माण केली फक्त दुसऱ्याचं उचलायचं अशी टीका ठाकरेंनी विरोधकांवर बोलताना केली आहे. तुम्ही जन्माला कशाला आलात?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्तिथ केलाय.
उद्धव ठाकरेंच्या करून दाखवलं ह्या बॅनरवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय. ‘करून दाखवलं असा बोर्ड लावून आमच्या कामाचा श्रेय घेण्याचं काम विरोधक करत आहेत’ असं फडणवीस म्हणाले. ‘शेजारच्याचा मुलगा आपल्या मांडीवर बसवला तरी तो शेजारच्याचाच मुलगा राहतो तो आपला मुलगा होत नाही त्यामुळे आमच्या कामाचं श्रेय घेण्याचं प्रयत्न जर यांनी केलं तर ते सफल होणार नाही’ असं वक्तव्य करत फडणवीसांनी ठाकरेंना चांगलंच डिवचलं आहे .त्यावर ‘इतरांचे श्रेय चोरणारे आम्ही नाही’ असं शिंदेनी म्हटलंय. ‘इतरांचं श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली’ असा टोला शिंदेनी लगावला आहे.
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान
भाजपच्या प्रचारासाठी मैथिली ठाकूर मुंबईत; गायलं मराठी गाणं
पक्ष म्हणून नाही परिवार म्हणून एकत्र आलोय! अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य

