माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले…

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले…

| Updated on: Aug 16, 2026 | 5:43 PM

शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता.

शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र या पक्ष प्रवेशाला विरोध केला, त्यामुळे हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती,  परंतु आता त्यांनी मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं म्हटलं आहे.

दरम्यान संजय राऊत म्हणतात की जर आज गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये असते तर जिंवत असते? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की,  यावर मी फार काही बोलणार नाही, मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ज्या नेत्याला फार मोठं भवितव्य होतं असा नेता अचानक आपल्याला सोडून गेला. त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही.’ ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक आम्ही जिंकलो असतो, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, असंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 16, 2026 5:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us