पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ

पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ

| Updated on: Nov 25, 2026 | 1:52 PM

पुणे कोर्टाबाहेर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. गेट नंबर चारजवळ दोन हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार करत कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेने पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. हल्ल्यात जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे कोर्टाबाहेर धक्कादायक घटना घडली आहे. कोर्टाच्या गेट नंबर चार परिसरात दोन हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार करत कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर हल्लेखोरांनी पीडित व्यक्तीचा पाठलाग केला आणि फॅमिली कोर्टापर्यंत त्याला कोयत्याने मारहाण केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हातांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वीही पुण्यात कोयता गँगची दहशत समोर आली होती. या घटनेमुळे पोलिसांकडून कोयता गँग शहरात अस्तित्वात नसल्याचा दावा पुन्हा एकदा संशयाच्या घेऱ्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की गँगवॉरमुळे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Published on: Nov 25, 2026 1:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us