पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
पुणे मेट्रो मार्गिका 3 चे लोकार्पण पुण्याच्या विकासातील महत्त्वाचे पाऊल आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. ही देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो असून, सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारली आहे. अजित पवारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प पूर्णत्वास येत असून, शहरभरात मेट्रो जाळे विस्तारणार आहे.
पुणे मेट्रो मार्गिका 3 चे लोकार्पण पुण्याच्या विकासातील एक मैलाचा दगड आहे, असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा प्रकल्प पूर्णत्वास जात असून, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असलेल्या पुण्यात वाढत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेता, आधुनिक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काळाची गरज होती. पुणे मेट्रो मार्गिका 3 हा सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) साकारलेला देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे, जो टाटा आणि सिमेन्स यांच्या संयुक्त प्रकल्पातून उभा राहिला आहे. या मार्गिकेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ती देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो ठरणार आहे.
सुमारे 100 महिला ट्रेन पायलट गाड्या चालवतील आणि स्थानकांवरील निम्मे कर्मचारी महिलाच असतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थानकामुळे सावित्रीबाईंना आदरांजली वाहिली जात आहे. हिंजवडीचा आयटी पार्क आता मेट्रोने जोडला जात असून, या प्रकल्पाच्या यशामध्ये अजित पवारांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प पूर्ण होत असल्याचा आनंद सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
