पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे

पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे

| Updated on: Jun 04, 2026 | 7:03 PM

पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दारू अड्ड्यांना माल पुरवणारे, वाहतूक करणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांवरही पोलिसांचा फोकस असणार आहे.

पुण्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून संशयित ठिकाणांची झडती घेतली जात आहे. अनेक अवैध अड्ड्यांची माहिती पोलिसांकडे जमा होत असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jun 04, 2026 6:58 PM
Follow Us