Chitra Wagh : तुम्ही माणसं नाहीच… XXX लांडग्याच्या पुढची औलाद, हगवणेंच्या वकिलांच्या अजब युक्तिवादावरून चित्रा वाघ यांचा संताप
वकिलांमार्फत कोर्टामध्ये हागवणेंनी स्वतःला निर्दोष ठरवत मृत वैष्णवीवरच दोषारोप केले. वैष्णवीच्या चारित्र्यावर अनेक सवाल उपस्थित केले. यानंतर चित्रा वाघ या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी न्यायालयातील नुकताच एक युक्तीवाद समोर आला आहे. हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी केलेल्या अजब युक्तीवादावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘पोरीला हालहाल करून मारून टाकलंत अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलतां अरे हरामखोरांनो लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची….माणसं नाहीचं तुम्ही…’, असं म्हणत चित्रा वाघ यांनी हगवणे कुटुंबाकडून करण्यात आलेल्या छळावर संताप व्यक्त केला आहे.
पुढे त्यांनी असेही म्हटले की, खवीसाला कसे सगळेच खवीस मिळत जातात तसे हे हगवणे आणि त्यांची बाजू मांडणारे असल्याचे म्हणत वकिलांवर देखील हल्लाबोल केला. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये असंही म्हटलंय, पाईपाने मारमार मारलं …शरीराचा कुठला भाग असा नव्हता ज्यावर मारहाणीचे व्रण नव्हते आणि हे असले युक्तीवाद करून काय साध्य करायचं? असा आक्रमक सवालही केलाय. पुणे पोलीस एकेक पुरावा गोळा करा…. वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी यांचे जीव जाईस्तोवर फासावरचं लटकायला हवेत, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

