Bharat Jodo | राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज नांदेडमध्ये, पुढचा रोड मॅप काय? ठाकरे-पवार यात्रेत येणार? वाचा अपडेट्स!

आज सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास भारत जोडो यात्रेचा जथ्था नांदेडमध्ये प्रवेश करेल.

Bharat Jodo | राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज नांदेडमध्ये, पुढचा रोड मॅप काय? ठाकरे-पवार यात्रेत येणार? वाचा अपडेट्स!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 12:38 PM

नांदेडः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वातील भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा आज महाराष्ट्रात पोहोचतेय. आज रात्री तेलंगणातून ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश करेल. रात्री 9 वाजेच्या सुमारास भारत जोडो यात्रेचा जथ्था नांदेडमध्ये येईल. नांदेडमध्ये (Nanded) आज पहिली पदयात्रा संपन्न होईल. पुढील जवळपास 14 दिवस राहुल गांधी महाराष्ट्रातील (Maharashtra Congress) विविध जिल्ह्यांतून पदयात्रा काढतील.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर पासून सुरु झाली आहे. आज यात्रेचा 61 वा दिवस आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये ही यात्रा रात्री 9 वाजता प्रवेश करेल.

देगलूरमधील कलामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यात्रेच्या स्वागताचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने नांदेडमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे.

या कार्यक्रमानंतर 10 वाजता पुन्हा एकदा पदयात्रेला सुरुवात होईल. काँग्रेस सदस्यांच्या हाती यावेळी एकतेची मशाल असेल. देगलूर येथील गुरुद्वाऱ्याला भेट देतील. मंगळवारी वन्नाळी गुरुद्वारा, खतगाव फाटा, भोपाळा, शंकरनगर रामतीर्थ भागातून पुढे नायगाव येथे जाईल.

बुधवारी नायगाव ते वाझिरफाटा, नायगाव येथे मुक्काम असेल. गुरुवारी पिंपळगाव आणि शुक्रवारी नांदेडमधून ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करेल. तर 15 नोव्हेंबर रोजी ही यात्रा वाशिम जिल्हयात पोहोचेल. 10 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये तर 18 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी ही यात्रा मध्यप्रदेशात मार्गस्थ होईल.

काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यात्रेसाठी परिश्रम घेत आहेत.

आदित्य ठाकरे 10 तारखेला राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर उद्धव ठाकरे या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना नुकताच रुग्णालयातून डिशचार्ज मिळाला आहे. पुढील काही दिवसात ते राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.