Raj Thackeray LIVE : तुमच्या कानाखाली मारलेली नाही, त्यामुळे..; मीरा-भाईंदरमध्ये ‘राज’ गर्जना घुमली
Raj Thackeray Mira Bhayandar Sabha LIVE : मीरा भाईंदर येथे व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर आज त्याच ठिकाणी राज ठाकरे यांनी सभा घेत मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला आहे.
मिठाईवाल्याचा काही तरी झाला भाग. कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काही तरी काढत असतात. त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्या कानफटात बसली. मग व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या मारली होती? अजून नाही मारली, विषय समजून न घेता, काय झालं माहीत नसताना. कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन बंद करतात, असा थेट घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मीरा भाईंदर येथील सभेतून केला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी तोफ डागली आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, साधा छोटा प्रसंग होता तो. मोर्चासाठी महाराष्ट्र सैनिक पाणी प्यायला गेले. तर माणसाने कशासाठी मोर्चा काढता. त्याने सांगितलं हिंदी सक्तीचं केलं. म्हणे हिंदीतच इथे बोलतात. त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्या कानफटात बसली. मग व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या मारली होती? अजून नाही मारली, विषय समजून न घेता, काय झालं माहीत नसताना. कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन बंद करत असाल तर तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाही? दुकानं बंद करून किती दिवस राहणार? आम्ही काही घेतलं तर दुकानं सुरू राहतील ना? महाराष्ट्रात राहाताय शातं पणे राहा, असा इशारा देखील यावेळी ठाकरेंनी दिला आहे.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

