Jaisalmer News : जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
भटोडा गावात जीवंत स्फोटकं आढळलेली आहेत. याठिकाणी नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं आढळलेली आहेत. जीवंत स्फोटकं आढळलेल्या भागात नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. लष्कराच्या जवानांनी हे स्फोटक निष्क्रिय देखील केलेले आहेत.
भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला केला जात आहे. सध्या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीच्या नियमांचं उल्लंघन न करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी काल पाकिस्तानकडून काही भागात पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थानच्या जैसलमेरमधल्या भटोडा गावात आता जीवंत स्फोटकं आढळून आलेले आहेत. जीवंत स्फोटकं आढळलेल्या ठिकाणी सैन्याचे जवान दाखल झाले असून हे स्फोटकं निष्क्रिय करण्यात आलेले आहेत.