पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्… पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता…

पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्… पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता…

| Updated on: Jun 23, 2026 | 12:39 PM

भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरयांच्यात उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैमनस्य आणि तीव्र संघर्ष राहिला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत.

अलीकडेच निकाल लागलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणात पद्मसींह पाटील यांची तसेच आठ जणांची पुराव्यांअभावी मुक्तता झाली. यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये वाद-विवाद झाले. याआधीही अनेक प्रकरणांवर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. आता ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असून ते महायुतीचा एक भाग झाले आहेत. यावर आता राणा जगजितसिंह यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘ओमराजेंसह सहा खासदारांचं महायुतीत स्वागत आहे, ते आता एनडीएत आल्याने विरोधक राहिले नाहीत…’

Published on: Jun 23, 2026 12:35 PM
Follow Us