दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर… रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर

दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर… रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर

| Updated on: Aug 03, 2026 | 6:26 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप आणि इतर त्रास जाणवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी स्वतः रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार पक्षाच्या कामासाठी सातत्याने दौरे करत आहेत. विविध बैठका आणि कार्यक्रमांमुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढल्याचे सांगितले जात आहे. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले.

रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जाणार आहे. गरज भासल्यास काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही प्रकृती बिघडल्याने त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Published on: Aug 03, 2026 6:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us