आता तरी सुषमाताईंना पक्षाने…सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 03, 2026 | 6:48 PM

सचिन अहिर यांनी महिनाभरापूर्वी ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांची बिनविरोध निवड झाली. आता नुकतीच माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

सचिन अहिर यांनी महिनाभरापूर्वी ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांची बिनविरोध निवड झाली. आता नुकतीच माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

जेजुरी देवस्थानाबाबत बोलताना अहिर म्हणाले, “जेजुरी देवस्थान बाबत काल भेट दिली. त्या ठिकाणी निधीबाबत चर्चा आणि आढावा काल घेण्यासाठी गेलो होतो. शिंदे गाटच्या ताकदीसाठी काम करत आहे.”

सुषमा अंधारे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत अहिर म्हणाले, “सुषमाताईंच्याबद्दल आधी भूमिका मांडली ती माझी वैयक्तिक भूमिका होती.” पुढे त्यांनी सांगितले की, “माझी आणि त्यांची कुठलीही चर्चा नाही, मात्र आतातरी पक्षाने त्यांना न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा राहणार, सुषमाताई त्याच पक्षात राहणार आहेत, बाकी त्यांची भूमिका त्या मांडतील” असेही सांगितले. पक्षाने त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, गोगावले यांच्या वक्तव्यावर पूर्ण कार्यक्रम पाहता आला नसल्याचे अहिर म्हणाले. भुजबळांच्या बॅनरवर बोलताना त्यांनी, “बॅनर लावून पालकमंत्रीपद दिलं जात नाही,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

Published on: Aug 03, 2026 6:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us