Sambhajinagar News : न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
Sambhajinagar Viral Video : जिथे सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण होते त्याच न्यायदान कक्षात ओल्या पार्ट्या रंगत असल्याचं बघायला मिळालं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा संभाजीनगरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
न्यायदान कक्षातच ओली पार्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगतील खळबळजनक प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. जिथे सरकारी बाबूकडून न्यायनिवाडा केला जातो तिथेच ओल्या पार्ट्या रंगत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सतीश राणे या बांधकाम व्यावसायिकाने या ओल्या पार्टीचं बिंग फोडलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात काही व्यक्ती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात बसून मद्य प्रश्न करताना दिसत आहे.
Published on: Mar 11, 2025 12:30 PM
Latest Videos

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
