Sandeep Deshpande : ‘लपवण्यासारखे काही नाही..’, मनसे नेत्याचा फोटो अन् राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sandeep Deshpande Post : मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बुलंद तोफ समजले जाणारे खासदार संजय राऊत आणि मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे अनेक वेळा एकमेकांना भिडताना दिसतात. मात्र एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे या दोघांमध्येही सूत जुळण्याचे संकेत मिळत आहेत. संदीप देशपांडे यांच्याकडून ‘एक्स’ सोशल मीडिया हँडलवरुन संदीप देशपांडे यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात ते संजय राऊत लिखित ‘नरकातला स्वर्ग’ हे अनुभव कथनपर पुस्तक वाचताना दिसत आहेत. यावर देशपांडे यांनी ‘लपवण्यासारखे काही नाही…’ असं कॅप्शन देत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे राजिकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे.
मी संजय राऊत यांना पत्र लिहून सविस्तर अभिप्राय कळवणार. अजून युतीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, ज्या दिवशी कुठलाही ठोस प्रस्ताव येईल, त्या दिवशी राज ठाकरे निर्णय घेतील. मात्र संजय राऊत यांच्या लिखानाबद्दल मला शंका नाही. ते उत्तम लिखाण करतात. मात्र आता यात लिहिलेलं किती खरं आणि किती खोटं हे पुस्तक वाचल्यावरच कळेल. मी लिहिलेला अभिप्राय राऊतांनी वाचायचा की नाही हा त्यांचा प्रश्न असतं तरी मी त्यांना याबद्दल नक्की अभिप्राय कळवेल, असं देशपांडे यांनी म्हंटलं .
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

