आणखी एका नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, रस्त्यावर उतरून तुम्ही काय उXXX…

आणखी एका नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, रस्त्यावर उतरून तुम्ही काय उXXX…

| Updated on: Jul 04, 2026 | 3:08 PM

मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवरून भाजप आमदार अमित साटम यांच्या वर्तनावरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. त्यांनी मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या प्रकरणावर हास्य केल्याच्या चर्चा आहेत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी अमित साटम यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवरून भाजप आमदार अमित साटम यांच्या वर्तनावरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. त्यांनी मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या प्रकरणावर हास्य केल्याच्या चर्चा आहेत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी अमित साटम यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर अमित साटम यांनी जोरदार प्रत्युत्तर देत सांगितले की, आम्ही फिल्डवर येऊन काम करतो… माणसांमध्ये येतो… तुमच्यासारखं मीडियावर पोस्ट करून आम्ही घरात बसत नाही. या प्रतिक्रियेला आता संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, ”तुम्ही फिल्डवर येऊन काय करता, तुम्ही फिल्डवर आल्यानंतरही अपघात का झाले? आताही तुम्ही फिल्डवर येऊन काय उXXX?” या प्रकरणानंतर आता राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. इतकेच नाही तर आता यावर नेमकं कोण काय भूमिका घेईल अन् काय प्रतिक्रिया देईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 04, 2026 3:04 PM
Follow Us