Sanjay Raut News : एकनाथ शिंदेंनी फक्त बेडूक उड्या मारल्या, त्यांना पंख नव्हते; राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut Criticized DCM Eknath Shinde : शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा महायुती सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली.
भय्याजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य हे भाजपच्या रणनीतीचा भाग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोशींच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, भय्याजी जोशी यांनी माफी मागायला हवी. ते इतर राज्यात जाऊन असं बोलू शकतात का? मुख्यमंत्र्यांनी यावर सभागृहात काल थातुरमातुर उत्तर दिलं. तुम्ही जर अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करता, त्यांना निलंबित करता, तर काल भय्याजी जोशींचा का निषेध केला नाही? कारण अबू आझमी मुस्लिम आहे, त्यांच्यावर कारवाई करणं सोप्प आहे, असा गंभीर आरोप देखील राऊत यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या कोरटकरने अपमान केला तो अजून का सापडत नाही? त्याला अभय कोणी दिलं? त्याला तुमचाच आशीर्वाद आहे, असंही आरोप राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपने एकनाथ शिंदे यांचे पंख छाटले का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना कधीच पंख नव्हते. त्यामुळे ते कधी उडूच शकले नाही. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या. पंख असणारा माणूस गरुडझेप घेतो, असा टोला यावेळी राऊतांनी लगावला आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
