Sanjay Raut : खासदारांच्या शिष्टमंडळावर राऊतांचा निशाणा, टुर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणत मोदी सरकारवर टीकास्त्र
'जागतिक स्तरावर काही प्रमुख देश नक्कीच महत्वाचे आहेत. मग तुम्ही श्रीलंकेला शिष्टमंडळ पाठवले का? म्यानमारला पाठवले का? सगळ्यात आधी तुम्ही शेजारच्या राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवायला पाहिजे. तुम्ही चीन, तुर्कस्थानलाही शिष्टमंडळ पाठवयला पाहिजे', असे राऊत म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरनंतर मोदी सरकारने जगातील काही प्रमुख देशात भारतातील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला. दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत भारताने ऑपरेश सिंदूर राबवून पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्यानंतर ऑपरेशन सिंदूरवर भूमिका मांडण्यासाठी खासदारांची काही टीम परदेशात जाणार आहे. त्यातील एक शिष्टमंडळ आज UAE साठी ते रवाना झालंय. श्रीकांत शिंदे यांचं हे शिष्टमंडळ UAE सह लायबेरिया, काँगो, सिएरा लिओनचा या देशाचा दौरा करणार आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करत सरकारवरच निशाणा साधत त्यातील कमतरता दाखवून दिली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना शिष्टमंडळावरून केंद्र सरकारला काही सवाल केलेत. ‘ज्या देशांचा भारत आणि पाकिस्तानशी काडीचाही संबंध नाही, अशा ठिकाणी शिष्टमंडळ पाठवण्याची गरज काय? ज्या प्रकारे हे शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रयत्न झाला तो काही बरोबर नाही. ज्या देशांचा भारत आणि पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, असे देश केंद्राकडून निवडण्यात आले आहे’, असं खोचक भाष्य करत राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

