AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल; संजय राऊतांनी नेमकं काय काय सांगितलं?

‘TMC चा पराभव नाहीच’, उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल; संजय राऊतांनी नेमकं काय काय सांगितलं?

| Updated on: May 06, 2026 | 11:44 AM
Share

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. यांमधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बंगालचे निकाल आणि ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार....

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. यांमधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बंगालचे निकाल आणि ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार….

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “खरं आहे ते, कालपर्यंत त्या इंडिया आघाडी सोबत नव्हत्या, पण आता इंडिया आघाडी त्यांच्या सोबत आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी म्हणजेच राहुल गांधी, उद्धव ठाकरे सर्वच प्रमुखांनी त्यांना फोन करून ‘आम्ही लढाईत सगळे तुमच्यासोबत आहोत’ ही भूमिका घेतलेली आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले, “ममता दीदी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत, हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग आहे. ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये अमित शाह, मोदी यांनी इराण-इस्रायल युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली. सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा, संपूर्ण केंद्र सरकार कोलकत्यात बसलं. मतदार याद्यातून लाखो नावं वगळली. ममता बॅनर्जी यांचा पराभव करून दाखवायचा या जिद्दीने किंवा ईर्षेने ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं. त्या जिंकलेल्या आहेत हे खरं आहे”

Published on: May 06, 2026 11:13 AM
Follow Us