रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्… बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!

रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्… बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!

| Updated on: Jun 07, 2026 | 12:14 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. इतकेच नाही तर चक्क भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव घेत मोठा दावा केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. इतकेच नाही तर चक्क भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव घेत मोठा दावा केला आहे.

संजय राऊतांनी कोकणातील शिवसेना नेते वैभव नाईक यांच्या चौकशीवरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. वैभव नाईक आंदोलन करतात तेव्हाच त्यांना नोटीस पाठवली जाते, असा दावा त्यांनी केला. या चौकशीला कोणतीही दिशा नसल्याचेही राऊत म्हणाले. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, आज (६ जून) रोजी मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणात भाजपशी संबंधित काही लोकांना अटक करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस शांत का आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या युनियनला आव्हान देण्यासाठी घुसखोरी केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

योगेश नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ही एक गँग आहे. यामध्ये रवींद्र चव्हाण थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसतात आणि युनियन तोडतात. त्यांनी हे कारभार केले त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनाच सोने तस्करीत पकडण्यात आले. यावेळी संजय राऊतांनी सत्ताधारी पक्षाला खडे बोल सुनावले.

Published on: Jun 07, 2026 12:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us