Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा

Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा

| Updated on: Nov 25, 2026 | 1:24 PM

संजय राऊत यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. २५ कोटींच्या प्रस्तावाबाबतचे आरोप निराधार असून, राऊत राजकारण करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. राऊत यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा गैरवापर केल्याचेही ते म्हणाले.

मंत्री संजय शिरसाट यांनी आज संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना तीव्र प्रत्युत्तर दिले. लातूर येथील उद्गीरकर यांच्या २५ कोटी रुपयांच्या प्रस्तावावरून राऊत यांनी केलेल्या आरोपांना शिरसाट यांनी फेटाळून लावले. “मला मंत्री म्हणून १० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार नाही. २५ कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे जातो,” असे त्यांनी स्पष्ट केले. राऊत अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा गैरवापर करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला.

शिरसाट यांनी यावेळी आपल्या कामांची माहिती दिली. दलित बांधवांसाठी आपण अनेक योजना राबवत असून, अण्णाभाऊ साठे आणि वामनदादा कर्डक यांच्या स्मारकांसाठी निधी मंजूर केल्याचे सांगितले. पूर्वीच्या मंत्रिमंडळावर टीका करत, त्यांनी दलित मंत्र्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांनी पुराव्याशिवाय आरोप केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही संजय शिरसाट यांनी दिला.

Published on: Nov 25, 2026 1:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us