जाता पंढरीशी सुख वाटे जिवा… संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग

जाता पंढरीशी सुख वाटे जिवा… संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग

| Updated on: Jul 12, 2026 | 3:19 PM

संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले असून, मंदिर परिसरात भक्तिरसाने भारलेले वातावरण पाहायला मिळाले.

यंदा पालखी रथाची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. रथावर “ब्रह्मा सोपान” ही अक्षरे विविध रंगांच्या फुलांनी साकारण्यात आली असून, या देखण्या सजावटीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पालखी रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

ताबळी नदीच्या काठावर वसलेल्या संत सोपानदेव महाराज मंदिर परिसरात टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. “जात पंढरीशी सुख वाटे जिवा” ही भावना प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.

दरम्यान, विठुरायाच्या भेटीची आस मनात ठेवून वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले असून, संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाची अनोखी किनार लाभली आहे.

Published on: Jul 12, 2026 3:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us