परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
ज्येष्ठ नागरिक सरोज दस्तूर यांना कॅब चालकाने मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपी निशांत शुक्ला याला वर्तक नगर पोलिसांनी घटनास्थळी नेऊन पंचनामा केला. ठाण्यातील जुपिटर रुग्णालयाबाहेरील फूटपाथ परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सरोज दस्तूर यांच्यावर झालेल्या मारहाणीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपी निशांत शुक्ला याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात आरोपीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
घटनास्थळी पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करत विविध पुरावे आणि माहिती गोळा केली. तसेच परिसरातील CCTV फुटेजही तपासले जात आहेत. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्तक नगर पोलीस ठाण्याकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे.