शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांच्या भेटीबाबत दत्तात्रय भरणे स्पष्टच म्हणाले…
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी मागच्या काळात जोर धरला होता. काँग्रेसच्या नेत्यांनीही या चर्चांना दुजोरा दिला होता. आता या चर्चा थांबलेल्या असतानाच नव्या चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी महायुतीत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी मागच्या काळात जोर धरला होता. काँग्रेसच्या नेत्यांनीही या चर्चांना दुजोरा दिला होता. आता या चर्चा थांबलेल्या असतानाच नव्या चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी महायुतीत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच शरद पवार महाविकास आघाडीतून फुटणार असल्याचं बोललं जात आहे. पवार गटाच्या नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत चर्चाही झाल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात मंत्री दत्ता भरणे यांना विचारले असता त्यांनी सुचक विधान केलं.
अलीकडेच उधाण आलेल्या चर्चांनूसर भाजपचे तावडे अन् जयंत पाटलांच्या भेटीने राजकारण तापवलं आहे. या भेटीबाबत सुप्रिया सुळेंनीही मिश्किल विधान केलं यानंतर आता राष्ट्रावादी (अजित पवार) गटातील नेते आणि मंत्री दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, दोघांमध्ये मैत्री असल्यामुळे दोघांची भेट झाली आसावी.
