AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचे NDA सोबत सुर जुळले? लेख लिहून मोदींचं कौतुक, म्हणाल्या...

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचे NDA सोबत सुर जुळले? लेख लिहून मोदींचं कौतुक, म्हणाल्या…

| Updated on: Jun 11, 2025 | 7:15 PM
Share

दहशतवाद विरोधातील लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक करण्यात आलं. तसेच परदेश दौऱ्यावरून येताच सुप्रिया सुळेंनी एका वृत्तपत्रासाठी लेखही लिहिला आहे.

सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक वर्तमान पत्रात लेख लिहून कौतुक केलं. मोदींनी सुळेंकडे पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या केलेल्या कौतुकाने भुवया उंचावल्या. दहशतवाद विरोधातील लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला असं या लेखात सुळेंनी म्हटलंय. केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर संदर्भात परदेशात पाठवलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे होत्या.

खासदारांचं शिष्टमंडळ मायदेशी आल्यानंतर मोदींनी सर्वांची भेट घेतली. भेटीवेळी पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावर पवारांबाबत आदर असता तर त्यांचा पक्ष फोडला नसता असं संजय राऊतांनी म्हटलंय. परदेशात गेलेल्या प्रत्येक खासदाराचे अनुभव मोदींनी विचारले. संकटकाळात देश दहशतवाद विरोधातील एकत्र आहे हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो असं मोदी म्हणाले. मोदींनी प्रियांका चतुर्वेदींच्या वडिलांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चा असताना सुळेंनी मोदींच्या केलेल्या कौतुकाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Published on: Jun 11, 2025 07:14 PM